धुळे । साक्री तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती साक्री अंतर्गत पिंपळनेर येथील उपबाजार समितीमध्ये 21 शेतकऱ्यांनी नारळ फोडून कांदा लिलावाचा शुभारंभ केला. यावेळी कांद्याला एक हजार 550 रुपयांचा गाव मिळाला आहे. तसेच निर्यात शुल्क माफ केल्याने शेतकरी संघटनेने यावेळी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, कांदा खरेदी विक्रीस सुरुवात झाल्यानंतर 160 वाहन कांद्याची आवक झाली.
कृषी उत्पन बाजार समिती साक्री अंतर्गत पिंपळनेर येथील उपबाजार समितीमध्ये कांदा बाजार सुरु झालेला आहे. यावेळी माजी कृषी तमापती हर्षवर्धन दहिते, माजी खासदार बापूसाहेब चौरे,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा उपसभापती भानुदास गांगुर्डे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत भदाणे, बाजार समितीचे संचालक नंदकुमार खैरनार, दिनकर बागुल,माजी उपसरपंच मुकुंदराव घरटे, दीपक साळुंके,शांताराम अहिरे, भास्कर पंवार,युवा नेते प्रवीण चौरे, योगेश नेरकर, रमेश महंत,उपसरपंच रावसाहेब घरटे, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष शिरीष सोनवणे, संचालक विजय बागुल, शेतकरी संघटनेचे भटू अकलाहे, शशिकांत भदाणे आदी उपस्थित होते.
कांद्याचे वाहन लावण्याचे कोणतेही गेटपास, एन्ट्री फी घेतली जाणार नाही. सर्व शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे रोखीने अदा करण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या हिशोबातून सेवा शुल्क अथवा इतर शुल्क कपात केले जाणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना लाभ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी व्यापारी संचालक किरण कोठावदे,हेमंत कोठावदे, नासीर सय्यद,हर्षद काकुस्ते, अरुण नंदन, नीलेश चौधरी, रावसाहेब घरटे, प्रवीण कोठावदे, आबा राणे, गणेश सुपेकर, प्रवीण शिंपी, तुषार बोले, भालचंद्र कोठावदे आदींनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेत कृषी माल खरेदी केला. बाजार समितीचे सचिव भूषण बच्छाव, शाखा प्रमुख विशाल देसले, संजोग अहिरराव, साहेबराम भारनर, दीपक सैंदाणे, संदिप अहिरराव, धीरज गावित, नितीन तोरवणे, रवींद्र वाघ यांच्यासह व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post