सोशल मीडियावर वारंवार अनेक विचित्र घटना समोर येत असतात. त्यातच पुन्हा एकदा हादरवणार व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्यात एका व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्यासह धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्देवाने त्या कुत्र्याचा आणि व्यक्तीचा तोल जातो. धक्कादायक म्हणजे, तो पाळीव कुत्रा रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये पडला जातो. सर्व धक्कादायक घटना प्लॅटफॉर्मवरील एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलेली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे. सध्या हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील Ghar Ke Kalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. मात्र, ही घटना नक्की कुठल्या शहरातील आहे आणि कधीची आहे हे समजले नाही.
Wtf
pic.twitter.com/LF6xmGSdjw— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 1, 2025
नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया
ही घटना पाहिल्यानंतर अनेकांनी आपली मते व्यक्त केलेली आहेत. त्यातील काही यूजर्संनी त्या ”कुत्र्याच्या मालकाविरोद्धात कारवाई करावी” असे लिहिले आहे तर काहींनी,”पाळीव प्राण्यांना साभांळता येत नसेल तर पाळू नये”असेही लिहिले आहे. ऐवढेच नाही तर एका यूजरने कमेंट केली,”पहिल्यांदा प्रवास करतोय असं वाटतं आहे” तर अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
Discussion about this post