पाचोरा : तालुक्यातील लोहटार येथे धक्कादायक घटना समोर आली असून येथील ईश्वर नामदेव पाटील (७८) आणि पत्नी प्रमिलाबाई ईश्वर पाटील (७२) या वृद्ध दांपत्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली.
यादांपत्याने पोलीस स्टेशनमध्ये फोन करुन आत्महत्या करीत असल्याचं कळवल. तसेच आत्महत्येला कोणालाही कारणीभूत धरु नये, अशी चिठ्ठी लिहिली. तालुक्यातील लोहटार येथील ईश्वर नामदेव पाटील हे पत्नी प्रमिलाबाई तसेच मुले सुना-नातवंड या परिवारासह वास्तव्यास होते. ईश्वर पाटील हे एस. टी महामंडळात कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले होते.
दरम्यान, ८ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ईश्वर पाटील यांनी पाचोरा पोलिस स्टेशन येथे फोन केला. मी आणि माझी पत्नी या संसाराला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. आमच्या आत्महत्येस कोणालाही कारणीभूत धरू नये, अशी माहिती पोलीस स्टेशनमध्ये दिली. फोनवरील माहिती ऐकून पोलिसांना धक्का बसला.
घटनेची पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहेत.
Discussion about this post