मुंबई । गेल्या दहा महिन्यापासून अधिक काळापासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद रिक्त असून आता लवकरच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास सहा नावाची चर्चा आहे. त्यामध्ये एक नाव महाराष्ट्रातील असून या आठवडाभरात राष्ट्रीय अध्यक्ष ठरणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. यामुळे भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. भाजपच्या नव्या अध्यक्षाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष याच आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे. भाजपचा स्थापना दिवस 6 एप्रिलला होत आहे. तत्पूर्वी म्हणजे 5 एप्रिलपर्यंत भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. अनेक राज्यातील संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचे नाव आता जाहीर होणार आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, डी. पुरंदरेश्वरी या ज्येष्ठ नेत्यांची नावे सध्या आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष याच आठवड्यात ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. 2014 मध्ये देशात भाजपची सत्ता आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शाह विराजमान झाले होते. तर 2019 मध्ये जे. पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळही संपला आहे. त्यानंतर नड्डा यांना केंड्रिय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
Discussion about this post