जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. तो बीएससीच्या वर्गात शिक्षण घेत होता. धीरज प्रभाकर कोष्टी असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
धीरज कोष्टी हा शनिवारी (ता. ८) सायंकाळी आई– वडिलांसोबत खालच्या खोलीत गप्पा मारल्या. काही वेळाने तो दुसऱ्या मजल्यावर गेला व दोरीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही धीरज खाली का येत नाही. हे पाहण्यासाठी धीरजचे कुटुंब वरील मजल्यावर गेले असता, धीरज गळफास घेतलेल्या दिसून आल्यावर आईवडिलांनी हंबरडा फोडला.
शेजारील ग्रामस्थांनी धाव घेऊन धीरजला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. धीरजच्या पश्चात आई कांताबाई, वडील प्रभाकर कोष्टी, तीन बहिणी असा परिवार आहे
Discussion about this post