छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते. दरम्यान या चकमकीत दोन सैनिक जखमी झाले आहेत पण धोक्याबाहेर आहेत.
बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत आणि दोन सैनिकांना किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच, डीव्हीसीएम कॅडर नक्षलवादी जगदीशच्या मृत्यूचीही माहिती आहे.
यापूर्वी, सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले होते की, सुकमा-दंतेवाडा सीमेवरील उपमपल्ली केरळपाल परिसरातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १५ नक्षलवादी ठार झाले. चकमक अजूनही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळपाल पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक झाली. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक घडली.
शुक्रवारी रात्री माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर, सुकमा जिल्ह्यातील डीआरजी आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक नक्षलविरोधी शोध मोहिमेसाठी रवाना झाले होते. या मोहिमेदरम्यान चकमक सुरू असून, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आहे. या चकमकीत डीव्हीसीएम कॅडर नक्षलवादी जगदीश देखील मारला गेला.
यापूर्वी २५ लाख रुपयांच्या इनामाची घोषणा असलेला नक्षलवादी सुधाकरही मारला गेला होता. चकमकीत दोघा सैनिकांना जखमी झाल्याची माहिती असून, त्यांना सुकमा येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या, चकमकीच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा दलांकडून सखोल शोधमोहीम सुरू आहे.
Discussion about this post