पुण्यातील दौंडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दौंडच्या बोरावके नगरमध्ये कचऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भकं सापडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.ही अर्भकं नेमकी कोणाची आहेत, कोणत्या रुग्णालयाने ती फेकून दिली आहेत का, या अनुषंगाने सध्या दौंड पोलिसांकडून तपास सुरू आहे.
बोरावके नगरमधील स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या 112 क्रमांकाला फोन करून या संदर्भातील माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची पाहणी करताच पोलिसांनी पाहणी अंती पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक देखील या ठिकाणी बोलावले आहे. हे अर्भक आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून हे या ठिकाणी कसे आले याचा शोध आता दौंड पोलीस करत आहेत. वैद्यकीय तज्ञांच्या अहवालानुसार यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
या ठिकाणी हे अर्भक कसे आले की कोणी टाकले आहेत याचा देखील शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे अर्भक आणि काही मानवी शरीराचे अवशेष सीलबंद बरण्यांमध्ये ठेवली असून त्यावरती त्या संदर्भातील माहिती देखील आहे आणि ते 2020 मधील आहेत अशी प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. मात्र, या कचऱ्याच्या ढिकाऱ्यात हे अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष कसे आले याचा शोध दौंड पोलीस घेत आहेत.
Discussion about this post