भारतीय डाक विभागात नोकरीची इच्छा आलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. पोस्ट ऑफिसमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. टेक्निकल सुपरवायजर या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इच्छुक उमेदवार indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ()
भारतीय डाक विभागात सुपरवायजर पदावर काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
डाक विभागातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २२ ते ३० वर्षे असावे.नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनियरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा केलेला असावा.याचसोबत कोणत्याही ऑटोमोबाईल फर्ममध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
पोस्ट ऑफिसमधील या भरतीमध्ये निवड झाल्यास उमेदवाराला ७ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ट्रेड टेस्टमध्ये सहभागी व्हावे लागेल.या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी फॉर्म आणि कागदपत्रे स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत. तुम्हाला हा अर्ज सीनियर मॅनेजर, मेल मोटर सेवा, कोलकाता, १३९, बेलेघाटा रोडा, कोलकाता-७०००१५ येथे अर्ज पाठवायचा आहे.
Discussion about this post