सरकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. एक्झिम बँकेतकाही रिक्त पदांसाठी भरती निघालीय असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एक्झिम बँकेत २८ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २२ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइट eximbankindia.in वर जाऊन अर्ज करु शकतात.या बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी, डेप्युटी मॅनेजर, चीफ मॅनेजर अशा अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
एक्झिम बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी- डिजिटल टेक्नोलॉजीसाठी १० जागा रिक्त आहेत. मॅनेजमेंट ट्रेनी रिसर्च अँड अॅनालिसिस पदासाठी ५ जागा रिक्त आहेत. मॅनेजमेंट ट्रेनी राजभाषासाठी २ तर लीगल मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी ५ जागा रिक्त आहेत.
डेप्युटी मॅनेजर (लीगल) पदासाठी ४ जागा रिक्त आहे. डेप्युटी मॅनेजर ज्युनियर मॅनेजमेंट पदासाठी १ जागा रिक्त आहे. चीफ मॅनेजर पदासाठी १ जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
एक्झिम बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने शुल्कदेखील भरायचे आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम eximbankindia.in या वेबसाइटवर जा.
यानंतर होमपेजवर करिअर या सेक्शनमद्ये जा.
यानंतर EXIM Bank Recruitment 2025 या लिंकवर क्लिक करा. यानंतर सर्व माहिती वाचा.
यानंतर New Registration करुन सर्व माहिती भरावी.
यानंतर लॉग इन करा. सर्व फॉर्म, कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर शुल्क भरा. फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
Discussion about this post