जळगाव । वर्क ऑर्डर काढण्यासाठी दिड हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धरणगावत पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकार्याला जळगाव एसीबीने कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. प्रविण दिपक चौधरी (वय- 39 वर्ष) असे लाचखोराचे नाव आहे. तसेच उमेश किशोर पाटील, वय 36 धंदा-नोकरी, तांत्रिक सहाय्यक , मनरेगा पंचायत समिती धरणगांव (कंत्राटी सेवक) यास तक्रारदार यांना लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहीत केले म्हणून त्यांना देखील अटक करण्यात आली.
तक्रारदार यांना त्यांचे शेत शिवारात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गोठा शेड तयार करण्याचा कार्यारंभ आदेश देण्याचे मोबदल्यात प्रवीण चौधरी यांनी तक्रारदार यांचेकडे 2000 रू लाचची मागणी करून , तडजोडी 1500/- रू लाच रक्कम स्विकारली . तसेच आरोपी उमेश पाटील याने प्रवीण चौधरी यांचे सांगणे प्रमाणे गोठा शेड बांधकाम करण्याच्या जागेची आखणी करून सदर जागेचे जीपीएस प्रणालीद्वारे फोटो काढण्यासाठी तक्रारदार यांचे शेतात जाण्याकरिता पेट्रोल पाण्याचे नावाखाली तक्रारदार यांचेकडून पैसे स्विकारण्यास कोणताही विरोध न दर्शवता मुक संमती दर्शवून तक्रारदार यांना लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहीत केले म्हणून त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर बाबत वर नमुद आरोपी यांचे विरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशन, जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Discussion about this post