पंजाब नॅशनल बँकेत भरती प्रक्रिया सुरु असून तुम्हीही बँकेत नोकरी शोधात असाल तर नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहेत. या भरतीद्वारे एकूण ३५० रिक्त पदे भरली जाणार असून या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२५ आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी www.pnbindia.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. ()
पंजाब नॅशनल बँकेत ऑफिसर क्रेडिट, ऑफसर इंडस्ट्री, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे. जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर recruitmentho@pnb.co.in या ईमेलवर संपर्क साधा.
क्रेडिट ऑफिसर पदासाठी २५० जागा रिक्त आहे. इंडस्ट्री ऑफिसर पदासाठी ७५ जागा रिक्त आहे. आयटी मॅनेजर आणि सिनियर आयटी मॅनेजर पदासाठी प्रत्येकी ५-५ जागा रिक्त आहेत.इतर अनेक पदांसाठीदेखील रिक्त जागा आहेत.पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च आहे.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.pnbindia.in या वेबसाइटवर जायचे आहे.
या वेबसाइटवर Recruitment सेक्शनवर जाऊन अर्ज करायचा आहे.
यानंतर रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर आवश्यक माहिती भरावी.
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर शुल्क भरा. या अर्जाची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील लोकांना १५० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यामध्ये रिजनिंग, गणित, इंग्रजी, प्रोफेशनल नॉलेजसंबंधित प्रश्न विचारले जाणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.
Discussion about this post