इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. नुकतेच शिक्षण पूर्ण झाले असेल तर ही उत्तम संधी आहे या नोकरीसाठी २२ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान दिल्ली येथे अप्रेंटिस पदासाठी भरती आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.iocl.com या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे. (Indian Oil Corporation Recruitment)
या भरती मोहिमेत अर्ज करण्यासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत ITI / NCVT सर्टिफिकेट/संबंधित क्षेत्रात ३ वर्षांचे पॉलिटिकल इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा आर्ट्स, कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. १८ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला दहावी पासचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
याचसोबत ग्रॅज्युएशनचे प्रणामपत्र, डिग्री सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
तसेच जातीचे प्रणापत्र, पीओडब्ल्यूबीडी प्रणाणपत्र, पॅन कार्ड आधार कार्ड हे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
याचसोबत तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि सही अपलोड करायचा आहे.
या पदासाठी अर्ज करताना सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. तिथे जाऊन अप्रेंटिसशिप लिंकवर क्लिक करायचा आहे. याआधी रजिस्ट्रेशन करुन लॉग इन करा. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर शुल्क भरा.
Discussion about this post