नागपूर । नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या वादानंतर झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान हा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये म्हटले. हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांवरही हल्ला झाला. ४६ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
नागपूर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. फहीम खान याने दबाव जमवून चिथवणी दिल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे. फहीम खान याचा व्हिडीओही समोर आला आहे. चिथवणी देताना फहीम खान याचा एक व्हिडीओ पोलिसांना मिळाला आहे.
एफआयआरमध्ये काय ?
गुन्हा दाखल केल्यानंतरही फहीम खान याने मोठा जमाव जमावला. पोलिसांनी शांततेचं आवाहन केल्यानंतरही कट रचून प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियावरून चिथावणी दिली. जमावाने हातात कुऱ्हाड, दगड, लाठीकाठी घेऊन दहशत पसरवली. पेट्रोल बॉम्बने पोलिसांवर हल्ला केला, अश्लील शिवीगाळ केली. पोलिसांना घातक शस्त्र, जगडाने मारहाण करून जखमी केलं.
Discussion about this post