जळगाव : चाळीसगाव शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्यात कोल्ड्रिंक घेण्यासाठी जात असताना सात वर्षीय बालिकेला तिच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीने अपहरण करून तिचे कपडे काढून बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र या बालिकेला शिकवलेल्या बॅड टच मुळे ती प्रसंगावधान झाली आणि संशयित आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले. आरोपीविरोधात अपहरण पोस्को व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
रामवाडी, घाटरोड, चाळीसगाव शहरात सात वर्षाची मुलगी तिच्या आजीसोबत राहते. कोल्ड्रिंक घेण्यासाठी जात असताना घराशेजारी राहणारा आरोपी विठ्ठल उत्तम जगताप याने बालिकेचे तोंड दाबून, अपहरण करत परिसरातील पडक्या घरात नेऊन तिचे कपडे काढून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र बालिकेने प्रसंगवधान दाखवीत त्या ठिकाणाहून पळ काढला.
याप्रकरणी निलाबाई नारायण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अपहरण पोस्को व ॲट्रॉसिटीचा गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी हे करीत आहेत. संशयित आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
Discussion about this post