धुळे । मागील काही दिवसापूर्वी शिरपूर येथे पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या होत्या. यानंतर पुन्हा धुळे शहरामध्ये बनावट नोटा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.भारतीय चलनातील २५ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटांसह एका इसमाच्या आझाद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आझाद नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा चौफुली या ठिकाणाहून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची अंग झडती घेतली असता त्याकडे भारतीय चलनातील २५ हजार ९०० रुपयांच्या ५००, २०० व १०० रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या आहेत.
पोलिसात गुन्हा दाखल
दरम्यान एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून यासंदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित इसमाने या बनावट नोटा कुठून आणल्या?, त्याच्या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? या बाबत पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहेत.
Discussion about this post