हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विजिटिंग कंसल्टंट (ऑर्थोस्कोपी) पदासाठी भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. इच्छुक उमेदवार hal-india.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२५ आहे.
हिंदुस्तान एअरोनॉटिक्समधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस डिग्रीसोबत एमएस/डीएनबी (ऑर्थो) किंवा ऑर्थोस्कोपीमध्ये फेलोशिप केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ५ वर्षांचा अनुभव असायला हवा.
हिंदुस्तान एअरोनॉटिक्समदील या नोकरीसाठी एका विजिटसाठी ७००० रुपये मिळणार आहेत. याचसोबत ट्रॅव्हलसाठी वेगळे पैसे दिले जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्जाचा नमुना वेबसाइटवर देण्यात आला आहे. यामध्ये सर्व माहिती भरुन अर्ज चीफ मॅनेजर, औद्योगिक स्वास्थ केंद्र, हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड, बंगळुरु ५६००१७ येथे पाठवायचा आहे.
कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरी
सध्या कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ईएसआयसीमध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, सिनियर रेजिडंट अशा अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरती मोहिमेत ११३ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी esic.gov.in या वेबसाइटवर जाऊन सविस्तर माहिती चेक करा.
Discussion about this post