राज्यात मागील काही दिवसापासून राज्यात उन्हाचा चटका वाढला असून यातच राज्यात पावसाचा देखील अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रावर दुहेरी संकट ओढावले आहे. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कडाक्याचं उन्हाचा इशारा देण्यात आला आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
दुसरीकडे बुधवारपासून विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस आणि उन्हामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हवामानात चढ उतार होत असल्यामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात आज पाच जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तापमानात चढ उतार पाहायला मिळणार आहे. राज्यात पावासाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. बुधवारपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बुधवारपासून विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उपराजधानीचा पारा वाढला आहे. नागपूरमध्ये रविवारी 40.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सरासरीपेक्षा 5 अंश अधिक होते. नागपूरसह विदर्भातील पाच शहरांमध्ये 40 डिग्रीहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर 41.6,अकोला 40.5, वर्धा 40.2,अमरावतीमध्ये 40 अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. सोमवारी नागपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे..
जळगावात ढगाळ वातावरण –
जळगाव जिल्ह्यात आगामी तीन ते चार दिवस काही अंशी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत होती, वातावरणात बदल होऊन जळगाव शहरात जिल्ह्यात वाहत असलेल्या वेगवान वाऱ्यांमुळे तापमानात काही प्रमाणात घट झालेली पाहायला मिळाली. शनिवारी ४० अंशावर असलेले तापमान एका अंशाने कमी होऊन ३८ अंशावर आले होते. दरम्यान, वातावरणात होत असलेल्या बदलाचा परिणाम म्हणून आगामी तीन ते चार दिवस जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर, जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
Discussion about this post