केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. असिस्टंट कमिश्नर पदासाठी नोकरी करण्याची संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
केवीएसमध्ये असिस्टंट कमिश्नर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे. त्यांना ७८.८०० ते २,०९,२०० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. याचसोबत विविध भत्ते आणि सुविधांचाही लाभ मिळणार आहे. यामध्ये ट्रॅव्हल भत्ता, दैनिक भत्ता, मेडिकल फॅसिलिटी या मिळणार आहेत.
केवीएसमध्ये नॉन टिचिंग पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना अनेक जबाबदारीचे पालन करावे लागणार आहे. असिस्टंट कमिशनर पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना डेप्युटी कमिश्नर यांच्या कामात सहकार्य करावे लागेल. तसेच शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य साधने उपलब्ध करुन द्यायची आहेत. परीक्षा प्रक्रियेत सहकार्य करावे लागणार आहे. तसेच शिक्षकांना पाठ्यपुस्तकाबाबत मार्गदर्शन द्यायचे आहे. केवीएसमधील या नोकरीसाठी उमेदवारांना मानधन वर्क पर्फॉर्मन्स तसेच कामाचा अनुभवाद्वारे दिले जाणार आहे.
Discussion about this post