जळगाव | जळगाव तालुक्यातील मोहाडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. जिथे महावितरण कंपनीचे वसुली पथक आले होते. मात्र यावेळी थकाबाकीदाराकडून महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता जयेंद्र सपकाळे यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात गुरूवारी १३ मार्च रोजी महावितरण कंपनीचे वसुली पथक आले होते. महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता जयेंद्र सपकाळे हे आपल्या पथकातील सहकाऱ्यांसोबत वसुली साठी आले होते. सपकाळे हे शिरसोली विभागाचे अभियंते आहेत.
दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मोहाडी गावातील एका थकबाकीदाराकडे वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी थकबाकीदार याने सपकाळे यांच्यासह पथकाशी वाद घातला आणि त्यातूनच त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे महावितरण कंपनीचे कर्मचारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post