चोपडा । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत असून अशातच नवीन वीज मिटर बसवून देण्यासाठी साडेचार हजारांची लाच मागून ती कार्यालयातच स्वीकारताना चोपड्याच्या सहाय्यक अभियंत्यास जळगाव एसीबीने अटक केली आहे.अमित दिलीप सुलक्षणे (35, रा.प्लॉट.नं.60, बोरोले एक, चोपडा) असे अटकेतील अधिकार्याचे नाव आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, 23 वर्षीय तक्रारदाराकडे नवीन वीज मिटर बसवून देण्याकरीता महावितरण वीज कंपनीचा सहा.अभियंता अमित सुलक्षणे याने मंगळवार, 11 मार्च रोजी साडेपाच हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने साडेचार हजार रुपये देण्याचे ठरवत एसीबीकडे तक्रार नोंदवली व त्यानंतर लाच पडताळणी करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी सायंकाळी सुलक्षणे याने कार्यालयातच लाच स्वीकारल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. चोपडा शहर पोलिसात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव. ळगाव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, प्रणेश ठाकूर, मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
Discussion about this post