मुंबई । शरद पवार गटाचे प्रदेशाध्य जयंत पाटील गेल्या अनेक दिवसापासून राजकारणापासून दूर असल्याचं दिसून आले. यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना खळबळजनक विधान केले.
काय म्हणाले जयंत पाटील?
‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,’ असं जयंत पाटील म्हणाले असून त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्या वक्तव्याचा अर्थ काय, त्यांचा रोख कोणाकडे यासंदर्भात स्पष्टपणे काहीच जयंत पाटील भाषणात बोलले नाही. मात्र, यावेळी राजू शेट्टी यांनी आपले ऐकले असते तर ते खासदार राहिले असते, असे वक्तव्य केले.
लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत लढवली नव्हती. त्याचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाही. त्यांनी माझे ऐकले असते तर ते खासदार राहिले असते. ते माझा सल्ला ऐकत नाही. आपली एकी कायम ठेवा. संघर्ष करण्यासाठी ठाम रहा, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
जयंत पाटील यांची राजकीय फटकेबाजी
भाषणात जयंत पाटील यांनी राजकीय फटकेबाजी करत सरकारला घेरले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला आहे. राजू शेट्टी यांना माहिती आहे, निवडणुकीमध्ये किती पैसे वाटले जातात. त्यांना चांगला अनुभव आला आहे. आम्ही भाषण करुन दमलो आहोत. कारण लोकांना पैसे देऊन शांत केले जाते.तसेच हिंदुत्व समोर असते. मग तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल.
Discussion about this post