मुंबई । राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडला. यावेळी विविध घोषणा करण्यात आल्या. विशेष लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये मिळण्याची घोषणा अर्थसंकल्पात होईल, अशी आशा महिलांनी होती. मात्र, लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. अर्थमंत्री अजित पवारांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
लाडकी बहीण योजनेसाठी ३६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागच्या वर्षी लाडकी बहीण योजनेसाठी ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली नाही. या वर्षी १२ महिन्यांसाठी फक्त ३६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार नाहीत.
लाडकी बहीण योजनेत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ३६००० कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांन आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच
यंदाच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींच्या पदरात निराशाच पडली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये मिळतील, अशी आशा महिलांना होती. मात्र, अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे या वर्षी महिलांना २१०० रुपये मिळणार नाही. पुढच्या ५ वर्षात आता २१०० रुपये मिळणार की नाहीत याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल.
Discussion about this post