जळगाव । शहरातील सिंधी कॉलनी येथील विजय उर्फ सनी मनोज छाबडिया (वय २३) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. ८ मार्च रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय उर्फ सनी मनोज छाबडिया हा वडील आणि काका यांचेसह राहत होता. काही महिन्यांपासून तो घरीच होता. शुक्रवारी दि. ७ मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर तो घरीच होता. दरम्यान शनिवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास त्याने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली.
कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी शेजारच्या नागरिकांच्या मदतीने विजय याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Discussion about this post