उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह वाढल्याने जळगावसह राज्यात तापमानात मोठी घट झाली. राज्यातील बहुतांशी भागात सकाळच्या किमान तापमान कमी झाल्याने थंडी जाणवली. दिवसाचे तापमानही काहीसे कमी झाले.
निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र तापमानातील चढ उतार कायम राहतील तसेच कोकणात पुढील ५ दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
उत्तर भारतातून थंडी वाऱ्याचे प्रवाह राज्यात कालपासून येत आहे. या प्रवाहांमुळे राज्यातील किमान तापमान कमी झाले. त्यामुळे सकाळी हवेतील गारवा वाढला. उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात गारवा काहीसा अधिक होता. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील सर्वात कमी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाी. तर धुळे येथे ७.५ अंश सेल्सिअस तापमान होते.
परभणी येथील कृषी महाविद्यालयातही ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथे तापमानात लक्षणीय घट झाली होती.
दिवसाच्या कमाल तापमानातही घट पाहायला मिळाली. राज्यात कमाल तापमानातही घट झाली. सोलापुरात राज्यातील सर्वाधिक ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर राज्यातील इतर भागांमध्ये कमाल तापमानातही घट झाली होती. हवामान विभागाने राज्यातील तापमानात चढ उतार राहतील, असा अंदाज दिला.
Discussion about this post