नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेत १८००० पेक्षा जास्त पदे भरती केली जाणार आहेत.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीबाबत माहिती स्वतः आदिती तटकरेंनी दिली होती. अंगणवाडी सेविका पदासाठी एकूण ५६३९ जागा रिक्त आहेत. तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी १२३४२ पदे रिक्त आहेत. एकूण १८८८२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहेत.
अंगणवाडीतील या भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ३५ असणे गरजेचे आहे. विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या त्यांच्याच स्थानिक परिसरात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना जास्तीत जास्त २ मुले असावीत.
तसेच या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे शिक्षण १२वी पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कार्यालयीन वेळेत अर्ज करु शकतात. महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करायचा आहे.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती
सध्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेतदेखील भरती सुरु आहे.सर्किल बेस्ड एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी तुमच्याकडे आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२५ आहे.यासाठी तुम्हाला www.ippbonline.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
Discussion about this post