जळगाव । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसत आहे. याच दरम्यान शहरातील सावित्रीनगरात सुरेश हिराराम सोलंकी यांच्या घरी 15 फेब्रुवारी रोजी बंद घर फोडून चोरट्यांनी एक लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल व रोकड चोरुन नेली होती. या प्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून फुटेज तपासत 24 तासात विशाल मुरलीधर दाभाडे (रामेश्वर कॉलनी) याला ताब्यात घेतले. साथीदाराच्या मदतीने ही घरफोडी केल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांनी तपासाच्या कौशल्यातून त्याला एका पथकातून गजाआड केले. दीपक राजु पाटील (रा.तांबापुरा, जळगाव) याला मुक्ताईनगर येथून अटक केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोख नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस कॉन्सटेबल रतन गीते, नरेंद्र मोरे, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांनी ही कारवाई केली.
22 फेब्रुवारी रोजी गणेशपुरी मेहरुण येथे मोहसीन खान अजमल खान यांच्या राहत्या घरातून 23 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या गुन्ह्याच्या तपासात पथकाने एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
Discussion about this post