मुंबई । लग्न सराईचे दिवस सुरु असताना सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठला. परंतु यातच गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. दरम्यान नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा दरात कोणतेही बदल झाले नव्हते. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सोन्याला पुन्हा झळाळी आली असून सोन्याचे दर वाढले आहेत.
Good returns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज ४ मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 760 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,75,300 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,025 रुपयांना विकलं जात आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,250 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,530 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,753 रुपयांनी विकलं जात आहे.
जळगाव
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.
Discussion about this post