भुसावळ : हतनूर धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढू लागल्याने आज सकाळी 10 वाजता हतनुर धरणाचे 4 दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येणार आहे अशी माहिती मा. निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्याकडून देण्यात आली.
आज दिनांक 06/07/2023 रोजी , हतनुर धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झालेली आहे. यामुळे आज गुरुवारी सकाळी 10.00 वा. हतनुर धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येवून 136.00 क्युमेक्स (4803) क्यूसेक विसर्ग तापी नदी पात्रता सोडण्यात येणार आहे
तरी हतनूर धरणाचे खालील गावांमध्ये सूचना देऊन तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये याकरिता प्रत्येक गावात दवंडी द्वारे सूचना देणे आवश्यक आहे. हे आपले माहितीसाठी व कार्यवाहीसाठी सविनय सादर करण्यात येत आहे
Discussion about this post