जर तुम्ही केवळ 7वी पास असाल आणि सरकारी नोकरीसाठी प्रयन्त करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर मध्ये शिपाईची पदे भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. यासाठी 04 मार्च 2025 पर्यन्त अर्ज करता येणार आहे. त्यामुळे फक्त काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
या भरतीमध्ये शिपाई हे पद भरण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई उच्च न्यायालय नागपूर असणार आहे. या भरतीद्वारे शिपाई हे पद भरण्यात येणार आहे.
पद किती किती लागेल शिक्षण?
एकूण : 45 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शिपाई या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार केवळ 7वी पास असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये उमेदवाराला 16,600/- ते 52,400/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे केवळ 7 वी पास वर चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये जर कोणी 7वी पास असेल तर त्याला ही माहिती कळवा.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर माागसवर्गीय उमेदवारांना यात 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी थेट अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज सादर करू शकता.
अर्ज शुल्क : 50 रुपये अर्ज शुल्क आहे.
निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2025 आहे.
निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.
परीक्षेची तारीख : उमेदवारांना परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे.
Discussion about this post