चाळीसगाव । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील एक लॉन्समध्ये चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरदेवाची आई जेवायला बसली असता त्यांच्या जवळ असलेली साडे दहा लाख रुपयांच्या किमतीची दागिन्यांची पिशवी घेऊन चोरटा पसार झाला. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून तपास सुरु करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुनील पाटील यांच्या कन्येच्या लग्नात हा चोरीचा प्रकार घडला आहे. सदरचा विवाह सोहळा चाळीसगाव शहरातील धुळे रस्त्यावर विराम लॉन्स याठिकाणी पार पडला. पण लग्न लागल्यानंतर पाहुणे मंडळींसोबत नवरदेवाची आई अंजली पाटील या जेवायला बसल्या होत्या. यावेळी त्यांच्याजवळ सुमारे साडेदहा लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पिशवी होती. हि पिशवी त्यांनी एका खुर्चीजवळ ठेवली.
चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद
लग्नात वेगवेगळ्या नऊ प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवी नवरदेवाची आई अंजली पाटील यांच्याकडे होती. जेवण करत असताना त्यांनी ही पिशवी खुर्चीजवळ खाली ठेवली होती. हि संधी साधत अल्पवयीन असलेल्या चोरट्याने त्यांची नजर चुकवून दागिन्यांची पिशवी लांबवली. हा सर्व प्रकार लॉन्समध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
Discussion about this post