जालना । राज्यात आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरूवात झाली आहे. आज शुक्रवारी दहावीचा मराठीचा पेपर होता. परिक्षा सुरू असतानाच मात्र जालन्यातील बदनापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जालन्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठीचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली आहे.दहावीच्या मराठीची प्रश्नपत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आली. त्यानंतर परीक्षा केंद्राच्याबाहेरील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्या. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ मिनीटात हा पेपर फुटला आहे. जालन्यातील बदनापूरात हा पेपर फुटीचा प्रकार घडला आहे. परिक्षाच्या केंद्राच्या बाहेर शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघड झालाय.
सकाळी पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटात दहावीच्या मराठीची प्रश्नपत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आली. त्यानंतर झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रकार समोर आलाय. २० रूपयात उत्तरपत्रिका विकली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॉर्ड दहावीचा पेपर रद्द करणार की, नाही, कारवाई होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Discussion about this post