तुमचंही बँकेत नोकरीचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर आणि ऑफिसर पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १९ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी www.bankofbaroda.in या वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. ()
बँक ऑफ बडोदामध्ये सिनियर मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर पदांसाठी भरती सुरु आहे. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, ट्रेड अँड फॉरेक्स, रिस्क मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये नोकरीची संधी आहे. बँकेत अधिकारी होण्याची संधी आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई/बीटेक/एमटेक/एमई/ कॉम्प्युटर सायन्समध्ये एमसीए/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ आयटी/ डेटा सायन्स/ ग्रॅज्युएशन/ सीए/ पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवाराकडे कामाचा अनुभव असावा.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, सायकोमॅट्रिक परीक्षण, ग्रुप डिस्कशन, मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
Discussion about this post