प्रयागराज महाकुंभात स्नान करून परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या टाटा सुमो आणि ट्रकचा झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, ६ जण गंभीर जखमी झाल्याची घटना जौनपूरच्या बदलापूर पोलीस स्टेशन परिसरात घडली.
अपघात नेमका कसा घडला?
महाकुंभमेळ्यात स्नान करून परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या टाटा सुमोचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील प्रत्यक्षदर्शींनीनी सांगितले की, सुमोने अचानक ट्रकला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होती की, यात चालक आणि २ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
नंतर स्थानिक लोकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न केला. नंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या अपघातात जे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा अपघात घडला कसा? या अपघाताला जबाबदार कोण? याचा तपास पोलीस करीत आहे.
अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. टाटा सुमो आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. ट्रकला धडकलेल्या टाटा सुमो या वाहनाचा चकणाचूर झाला आहे. गाडीचा पुढील भाग आतल्या बाजूस गेला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्तांना तातडीने रूग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Discussion about this post