जळगाव । अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राज्य पिंजून काढण्याचा निर्धार केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार येत्या १० जुलैस खानदेशच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात मुक्ताईनगरला त्यांची जाहीर सभा होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर व माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे मुंबईत असून, त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर शरद पवार यांनी स्वत: पक्षाची नव्याने मोट बांधण्यासाठी राज्य पिंजून काढण्याचा निर्धार बोलून दाखविला होता.
त्यानुसार त्यांचा पहिलाच दौरा उत्तर महाराष्ट्रात होत असून, नाशिक, धुळे व नंतर जळगावला १० जुलैला ते येणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील दौऱ्यात त्यांनी मुक्ताईनगर येथे जाहीर सभा घेण्यासाठी सहमती दर्शविल्याचे ॲड. रोहिणी खडसे यांनी सांगितले.जळगाव जिल्ह्यात अन्यत्र कुठे कार्यक्रम घेण्याबाबत अद्याप ठरायचे असून, त्यांचा अधिकृत दौराही यथावकाश प्राप्त होणार आहे.















Discussion about this post