जळगाव । अमळनेर शहरातील आयडीबीआय बँकेतून पैसे काढून दुचाकीने घरी आल्यानंतर दुचाकी घरासमोर पार्क करत असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरटे दुचाकीला लावलेल्या कापडी पिशवीला जोरदार झटका देऊन ९ लाखांची रोकड घेऊन पसार झाले. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.४ संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत रामदास शिंगाणे वय-५८, रा. भोईवाडा, अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते सेवानिवृत्त आहेत. चंद्रकांत रामदास शिंगाणे आय डी बी आय बँकेतून ९ लाख रुपये काढून कापडी पिशवीत ठेवत दुचाकीने घरी आले होते. त्यावेळी भोईवाडा येथील घरासमोर ते दुचाकी लावत असताना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकी येऊन त्यांच्या दुचाकीला लावलेल्या पिशवीला झटका देऊन पसार झाले.
या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात दुपारी अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला . परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देान दुचाकींवरून जाताना चार संशयित चोरटे कैद झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे हे करीत आहे.
Discussion about this post