नाशिक । नाशिकमधून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यात एका हॉटेलच्या पार्किंग क्षेत्रात एका चार वर्षांच्या मुलाचा कारने चिरडून मृत्यू झाला आहे. ध्रुव अजित राजपूत (वय 5 वर्ष) असं मृत्यू झालेल्या चिमुरड्याच नाव असून ही घटना नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये घडली. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
अधिकची माहिती अशी की, वडिलांच्या सोबत हॉटेलच्या गार्डन मध्ये खेळून घरी जात असताना 5 वर्षीय चिमुकला इनोव्हाखाली आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय. ध्रुव अजित राजपूत (वय 5) असं मृत्यू झालेल्या चिमुरड्याच नाव आहे. मयत चिमुरड्याचे वडील अजित राजपूत हे मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदा सोबत हॉटेलमध्ये मुलांना खेळण्याठी घेऊन आले होते.
नाशिकमध्ये वडिलांच्या डोळ्यासमोर 5 वर्षाच्या मुलाला चिरडलं. चूक कोणाची?
-मोबाईलमध्ये गुंग असलेल्या वडिलांची?
-मागून धावत येणाऱ्या मुलाची?
-गेटच्या आत शिरणाऱ्या गाडीचालकाची? pic.twitter.com/ttd49Zdd1Z— Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) February 7, 2025
मात्र खेळून झाल्यानंतर घराकडे जात असताना ध्रुवच्या वडिलांचा हात सोडून लॉबीमध्ये जाताच ईनोव्हा गाडीने त्याला चिरडल्याने त्याचा यात मृत्यू झाल्याचं समोर आलंय. ज्या इनोव्ह गाडीने उडवले सदर गाडीचा चालक या मुलाला हॉस्पिटलमध्ये सोडून पाळाल्याचा आरोप करण्यात आलाय.
सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, एक कार हॉटेलच्या परिसरात प्रवेश करताना दिसत आहे, तर अचानक एक मुलगा गाडीसमोरून धावतो. गाडी मुलाला धडकते आणि त्याला चिरडून पुढे जाते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा गाडीखाली चिरडल्याचे दिसत आहे. चिमुरड्याला चिरडलेल्या कार चालक दारू पिऊन गाडी चावलत होता, अशी तक्रार मयत मुलाच्या वडिलांनी पोलिसांत केली आहे. याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Discussion about this post