बुलढाणा । राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच बुलडाण्यामध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील टूणकी गावात ही घटना घडली. चिमुकलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपीला सोनाळा पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूणकी गावामध्ये राहणाऱ्या ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. २१ वर्षीय तरुणाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे. चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिमुकलीला जवळपास १५ ते १७ टाके लागल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलिसांनी मध्यप्रदेशमधील सुनील कालुसिंग निगवाले या आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सोनाळा पोलिस करत आहेत. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ वॉर्डमध्ये चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती गंभीर आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
Discussion about this post