तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. एनटीपीसीमध्ये सध्या भरती सुरु आहे. एनटीपीसीने तालचेर थर्मल हॉस्पिटलमध्ये जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे.या नोकरीसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ()
एनटीपीसीमधील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला ntpc.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. एनटीपीसीमधील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२५ आहे. मेडिकल ऑफिसर पदासाठी ही भरती होणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (NTPC Recruitment 2025)
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आपला रिझुम्ये, फोटो, जन्म तारीख, शैक्षणिक पात्रता, एमसीआय सर्टिफिकेट, अनुभवाचे सर्टिफिकेट सर्वकाही स्कॅन करुन पाठवायचे आहे. तुम्ही १९ फेब्रुवारीपर्यंत shivamgupta01@ntpc.co.in या मेलवर ही माहिती पाठवू शकतात.
आयकर विभागात भरती
सध्या आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.आयकर विभागात स्टेनोग्राफर ग्रेड १ पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी आयकर विभागाने अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवाराला ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे.
Discussion about this post