सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये २६६ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल १ पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष पदवी पास असलेल्या तरुणांसाठी नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही centralbankofindia.co.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
पात्रता आणि वयाची अट :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. मेडिकल, इंजिनियरिंग आणि सीए पदवी प्राप्त उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अर्जदाराचे वय २१ ते ३२ वर्षांमध्ये असावे.
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन क्लिक करावे लागेल.
Click here for New Registration यावर क्लिक करायचं आहे.
यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर सर्व माहिती भरावी.
यानंतर सही आणि फोटोग्राफ अपलोड करायचे आहे. यानंतर शुल्क भरायचे आहे.यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.
फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क जमा करायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना १७५ रुपये शुल्क भरायचे आहे.
Discussion about this post