अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अनोखा विवाह पार पडला. मात्र या लग्नाची चर्चा राज्यभर सुरु आहे. कारणही तसंच आहे. ग्रामीण भागातील तरुणाने थेट चिनी मुलीसोबत लग्नगाठ बांधली आहे. राहुल हांडे (वय २९ वर्ष) असं या नवविवाहित तरुणाचं नाव असून शान छांग असं चिनी नवरीचं नाव आहे.
राहुल हांडे हा संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावातील रहिवाशी आहे. तो राहुल हांडे हा चीनमध्ये गेल्या सात आठ वर्षापासून योगाचे धडे देत आहे. योग शिक्षक म्हणून काम करताना चीनमधील यान छांग या मुलीशी त्याचे सुत जुळले आणी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
चीनमध्ये त्यानी रजिस्टर लग्न केल्यानंतर राहुल यान छांग हिला घेऊन आपल्या गावी आला आणी पारंपारिक हिंदू पद्धतीने सर्वांच्या उपस्थितीत पुन्हा लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. हळदीपासून सर्व विधी पार पडताना यान छांग अगदी भारावून गेली होती.
Discussion about this post