जळगाव | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपासुन “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,जळगाव येथे करण्यात आले होते.
या मेळाव्याला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहास गाजरे , जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संदीप गायकवाड हे उपस्थित होते. या मेळाव्या करिता नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव येथील उद्योजक व आस्थापनांनी सहभाग नोंदवलाहोता तसेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक,जळगाव, गोविंदा एचआर सर्विसेस नाशिक, हिताची इष्टिमो ब्रेक सिस्टीम्स जळगाव, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्स जळगाव,किरण मशीन टूल्स जळगाव, अशा एकुण 15 आस्थापनांनी 1100 पेक्षा जास्त रिक्त पदे अधिसूचित केली होती.
या मेळाव्याला ऑनलाईन नोंदणी केलेले 25 उमेदवार तर ऑफलाईन नोंदणी केलेले 393 उमेदवार उपस्थित होते त्यापैकी एकुण 203 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी एकुण 122 उमेदवारांची प्राथमिक निवड व 07 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.
या मेळाव्याचे प्रास्ताविक करताना श्र संदीप गायकवाड सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार वउद्योजकता यांनी रोजगार मेळाव्याचा उद्देश व उपलब्ध रिक्त पदांबाबत उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे यांनी महाविद्यालयात सुरु असलेले अभ्यासक्रम व सोई सुविधा याबाबत माहिती दिली व उद्योजकांनी जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करुण देण्याबाबत आवाहन केले.
Discussion about this post