जळगाव । माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. खडसे आणि फडणवीस यांच्यातील दीर्घकाळचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत असून, ही भेट या संघर्षाचा अंत होण्याची चिन्हे दाखवत आहे.
दरम्यान एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतल्याने खडसे भाजपात प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरु आहे. यातच एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांची भेट घेतल्यानंतर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत खोचक टीका केलीय
‘एकनाथ खडसे सत्तापिपासून आहेत. जिकडे सत्ता तिकडे ते जाण्याचा प्रयत्न करतात. मागे महाविकास आघाडीत गेले आता लगेच इकडे गेले. आता भाजपात जायचा प्रयत्न करतायत. सत्तेतून मालमत्ता मिळवत आपलं दुकान चालू ठेवायचा त्यांचा प्रयत्न असतो. केवळ सत्तेसाठी नाही तर त्यांच्यामागील ईडी कारवाया कशा थांबतील यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतली असावी’ असं शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणालेत.
Discussion about this post