नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अंगणवाडी भरतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. पुढील १०० दिवसांत अंगणवाडीमधील रिक्त पदे भरण्याचे आदेश हे देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. त्यामुळे १२ वी पास महिलांसाठी नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी महिलांनी १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत ऑगस्ट २०२२ पासून भरती झालेल्या मदतनीसांना दहावी उत्तीर्ण असल्यास थेट सेविकापदी नियुक्ती केली जाणार आहे.याबाबत आता भरतीप्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. सध्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजापासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला नगर परिषद/नगर पंचायत / नगर पालिका / नगर पंचायत / ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील असणे गरजेचे आहे. रहिवासी असल्याचा पुरावा जोडणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी उमेदवाराने १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत पदव्युतर, डी एड, बी एड आणि एमएससीआयटी कोर्स केललेा असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
Discussion about this post