नवी दिल्ली । देशाचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला आहे. यावेळी केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर लागणार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.या अर्थसंकल्पात त्यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आयकर स्लॅबमध्ये बदल करण्यात आला असून 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
आता कर रचना कशी असणार ?
४ ते ८ लाख रुपयांवर ५ टक्के
८ ते १२ लाख रुपयांवर १० टक्के
१२ ते १६ लाख रुपयांवर १५ टक्के
१६ ते २० लाख रुपयांवर २० टक्के
२० ते २४ लाख रुपयांवर २५ टक्के
२४ पेक्षा जास्त ३० टक्के
Discussion about this post