राज्यात नव्या जीबी सिंड्रोम आजाराने टेन्शन वाढवले आहे. या आजाराचे राज्यातील काही जिल्ह्यात रुग्ण आढळले आहे. पुण्यात जीबी सिंड्रोम आजारामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला असून यामुळे पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ वर्षीय तरुणाचा तर पुण्यातील नांदेड गावातील एका ६० वर्षीय महिलेचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या आजाराने राज्यात आतापर्यंत ४ जणांचा बळी घेतले आहेत. त्यामुळे या आजाराची भीती वाढली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून ससून रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. नांदेड गावातली या महिलेला ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्यामुळे काही दिवस पुण्यातील खासगी रुग्ण्यालयात तिच्यावर उपचार सुरु होते.प्रकृती अजून खालावत चालल्याचे पाहून कुटुंबाने महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले होते. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना आज या महिलेचा मृत्यू झाला. पुण्यातील नांदेड गावात अनेक रुग्ण हे जीबीएस बाधित आहेत. त्यामधील या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. पुण्यातला तिसरा आणि राज्यातला हा चौथ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये जीबी सिंड्रोम आजाराने पहिला बळी घेतला आहे. ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात जीबी सिंड्रोमचे १३ संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी ५ रुग्ण हे बरे झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Discussion about this post