जळगाव । १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून यादरम्यान काय स्वस्त अन् काय महाग होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. यातच गेल्या अर्थसंकल्पावेळी केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी केल्याने सोन्याचे दर घसरले होते. मात्र यावेळी काय निर्णय घेतला जाईल याकडेही ग्राहाकांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यापूर्वी सोने आणि चांदीत तुफान दरवाढ झाली. जळगावच्या सराफा बाजारात दोन्ही धातुनी विक्रमी झेप घेतली आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या विक्रमी उच्चांकी गाठली आहे. जळगावात जीएसटीसह सोन्याचे दर ८४ हजार १५१ रुपयांवर पोहोचले आहे. आठवडाभरापासून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. बुधवारपाठोपाठ गुरुवारीही सोन्याने उच्चांकी दराची पातळी गाठली. दोन दिवसात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर ८४ हजार १५१ एवढे आजवरच्या उच्चांकी पातळीवर गेले आहे.
शेअर बाजारातील अस्थिरता, अमेरिकेची व्याजदरात कपात, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत अशा कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती सोने व्यावसायिकांनी दिली. जागतिक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यावर परिणाम दिसून येत असल्याचे दिसते.
Discussion about this post