जळगाव तालुक्यातीलजळगाव । जळगाव तालुक्यातील धानवड- पिंपळे शिवारातील शेतात मानवी शरिराचे अवशेष आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा घात पात तर नव्हे? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी प्राथमिक तपास करून पंचनामा करून मानवी अवशेष जप्त केले आणि ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एक तरुण जळगाव तालुक्यातील धानवड- पिंपळे शिवारातील शेतात जात असताना त्या तरुणाला शेतात मानवी शरिराचे काही अवशेष दिसून आले. त्याने याबाबतची माहिती पोलीस पाटलांना दिली असता त्यांनी लागलीच घटनास्थळी दाखल होत पाहणी करून खात्री केली असता, मानवी शरिरातील कवटी आणि हाता – पाया सह इतर अवशेष दिसून आले. त्यांनी लागलीच याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला या बाबत माहिती दिली.
सदर मृतदेह या ठिकाणी कसा आला, तो पुरुषाचा की स्त्रीचा, मृत्यूचे कारण काय आहे, घात – पात तर नव्हे ? अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्या साठी या मृतदेहाची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असून मृतदेहाच्या अवशेषांच्या आधारे डीएनए चाचणी देखील केली जाण्याची शक्यता आहे.
Discussion about this post