मुंबई । राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला असून अशामध्ये राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
या जिल्ह्यांना इशारा?
हवामान विभागाने ३ जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिली आहे. ४ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातसुद्धा ऑरेंज अलर्ट असणार आहे. तसेच विदर्भासाठी ३ जुलै रोजी यलो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी हलक्या अन् मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
6 जुलै रोजी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसात किंचितशी घट होण्याची शक्यता आहे. विदर्भ उपविभागासाठी पुढील 24 तासांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 6 जुलैपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील उपविभागांसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
जुलै महिन्याच्या सुरुवातीलपासूनच पावसाचा जोर वाढल्याने सर्वत्र तापमानात गारवा निर्माण झाला आहे. देशभरात सर्वत्र सामान्य तापमान पाच डिग्री सेल्सिअस आणि काही भागात त्याहूनही अधिक खाली घसरलं आहे.
Discussion about this post