भंडाऱ्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट झाला असून या स्फोटामध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की याचा परिणाम चार ते पाच किलोमीटरच्या परिसरात दिसून आला आहे. या घटनेत पाच ते सात लोक जखमी असल्याची माहिती आहे. कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. साबुदाण्यासारखा कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.
ज्या इमारतीत स्फोट झाला ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या कंपनीचे अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या इमारतीत स्फोट झाला तेव्हा 14 कामगार कार्यरत होते.सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. काही कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
Discussion about this post