जळगाव । धावत्या चार चाकीला अचानक आग लागल्याची घटना जळगाव शहरातील मोहाडी रोड व लांडोरखोरी उद्यानाजवळ आज सकाळी घडली. बघता बघता या आगीत कार जाळून खाक झाली आहे. परंतु सुदैवाने या घटनेत कोणालाही जीवितहानी झालेली नाही.
गुरमीर सिंग हे त्यांच्या गाडीमध्ये प्रवास करत असताना अचानक गाडीला आग लागली. या घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले आणि गाडीचा मोठा आगीचा प्रसार थांबवला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी काही प्रयत्न केले, परंतु अग्निशमन दलाच्या वेगवान कार्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी, त्यामध्ये कोणालाही शारीरिक इजा झाली नाही. घटनेची पुढील तपासणी सुरु आहे.
Discussion about this post